शतावरी ही एक उत्तम औषधी वनस्पती असून ती काटेरी झुपकेदार वेल स्वरूपात असते.
वैज्ञानिक नाव "Asparagus racemosus" आहे.
शतावरी ही एक पर्णहीन, काटेरी, बहुवार्षिक वेल आहे. खोडावर वाढणाऱ्या लांब व मोठय़ा फांद्यांना अनेक पेर असतात. या प्रत्येक पेरावर लहान, हिरव्या, एकाआड एक उपफांद्या असतात. या फांद्यांना ‘पर्णकांडे’ म्हणतात. या पर्णकांड्या पानांप्रमाणे भासतात.
ही ‘पाने’ बारीक असून सुरूच्या पानासारखी दिसतात.
शतावरीच्या मुळ्या आणि अंकुर या भागांपासून औषधी रसायने मिळवतात. शतावरीची चव गोड आणि कडू असते.
कडू-गोड चवीची, शीतवीर्याची असून मुळे व पाने औषध म्हणून वापरली जातात. शतावरीच्या कंदामध्ये फॉस्फरस, रायबोफलेवीन, थायमीन, पोटँशियम, व इतरही रासायनिक द्रव्ये आहेत. शतावरीमध्ये व्हिटॅमिन –ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी-कॉम्पलेक्स जास्त प्रमाणात आढळतात.
शतावरीच्या कंदामध्ये सॅपोनिन, ग्लायकोसाइड्स, फॉस्फरस, रिबोफ्लेव्हिन, थायमाईन, पोटॅशियम, कॅल्शियम व इतरही रासायनिक द्रव्ये आहेत.
महाराष्ट्रातील काही भागात शतावरीला 'ससूर/सुसर मुळी' असेही म्हणतात. व याची करून भााजी करून खााल्ली जाते. साधारणत: राना-वनांत वा शेतांत मृृृृग नक्षत्रातील पहिल्या काही पावसानंतर ही वनस्पती जमिनीतून वर निघते. आणि कोवळे कोवळे कोंब खूडून आणून याची भाजी बनविली जाते.
आपल्या शेतात शतावरी लावणे आरोग्याच्या दृष्टीने खुपच फायदयाची आहे.
शतावरी व आरोग्य
• शतावरी कफ आणि पित्त कमी करते.
•शतावरीपासून शतावरी घृत, विष्णू तेल, शतावरी कल्प तसेच प्रमेह मिशतेल तयार केले जातात. शतावरी स्नायूंची शक्ती वाढवण्यासाठी वापरली जाते.शतावरीचे नारायण तेल हे अर्धांगवायू व संधिवातासाठी उपयुक्त आहे.
•कंदाचा उपयोग पित्तप्रदर, ज्वर, धातुवृद्धी, मुतखडा, अपस्मार व रक्तशुद्धीसाठी केला जातो.
•कंदाचा उपयोग जनावरांमध्ये विशेषतः गायी, म्हशींमध्ये जास्त दूध मिळण्यासाठी केला जातो. शतावरी कल्प हा शतावरीच्या कंदापासून बनविला जातो.
•स्मृतिवर्धक म्हणून शतावरी कार्य करते.
• मासिक पाळीत अंगावरून खूप स्राव जाणे ही, नव्याने पाळी येणाऱ्या तरुण मुली व पाळी जाण्याच्या मेनोपॉझच्या काळात या तीनही तक्रारींमध्ये स्त्रियांना शतावरी वनस्पतीची मदत होते.
•स्त्रियांच्या सुलभ प्रसूतीसाठी हिचा वापर केला जातो.
•शतावरीचा उपयोग स्त्रीयांच्या लैगिंग इच्छाशक्तित वाढ होणे, बाळंतपणातील अशक्तपणा दूर करणेसाठी, दूधवृध्दीसाठी व प्रजोत्पादनासाठी होतो.
•शतावरीच्या मुळया दूधात वाटून लावल्यास स्तन वृध्दीसाठी त्याचा उपयोग होतो.
•शतावरी पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी करण्यासाठी देखील मदत करू शकते. हे निरोगी शुक्राणूंची संख्या वाढवते आणि गर्भधारणेची शक्यता वाढवते. शतावरी, जेव्हा अश्वगंधा औषधी वनस्पती एकत्र केल्या जातात, तेव्हा ते नपुंसकत्वांवर काम करतात.
•शतावरी एक नैसर्गिक प्रतिजैविक आहे आणि औषधी उपयोग केला जातो
•कँसर, क्षयरोग, कुष्ठरोग, आम्लपित्त, एडस इत्यादी आजारांवर उपचार करण्यासाठी शतावरी उपयोगात आणतात.
शतावरी कर्करोगावर वरदानरूप ठरली आहे.
@crazycervix
No comments:
Post a Comment