All Information Related to Women Health And Their Issues like Obstetrics,Pregnancy,Superstitions Mahila Arogya

Sunday, September 27, 2020

डॉक्टर ,बाळात व्यंग आलं तर?

"डॉक्टर,हे इंजेक्शन नको घ्यायला",डॉक्टर,ह्या गोळ्या नको घ्यायला किंवा ह्या गोळ्या गरोदरपणात चालतील का??","डॉक्टर ,बाळात व्यंग आलं तर??"हे प्रश्न नेहमी कोणी ना कोणी सरकारी वा खाजगी दवाखान्यात पेशंट किंवा पेशंट चे नातेवाईक विचारात असतात.साध्या रक्त वाढीच्या गोळ्या जरी दिल्या तरीही गरोदर माता तसेच प्रश्न निर्माण करुन सोडतात याचे उत्तर म्हणजे त्या गरोदर ताई च्या घरचीच मंडली.
आपला भारत देश खूप खूप चांगला आहे पण काही गोष्टी मुळे तो मागे जात आहे .भारतीय समुदायात अंधश्रद्धेवर जास्त भर आहे तेही आरोग्य च्या बाबतीत तर विचारू नकाच.अंधश्रद्धा आरोग्याच्या बाबतीत अशा की,
1)डॉक्टरांनी गरोदरपणात  दिलेल्या गोळ्या मुळे बाळात व्यंग येत?
 खरे पाहता ,कोणता डॉक्टर वा वैद्य मुद्दाम हून बाळात व्यंग यावे म्हणून गोळ्या देईल;स्त्रीरोगतज्ञ तर सोडाच... काही लोक तर अक्षरशः स्त्रीरोगतज्ञांनाच विचारतातच की,डॉक्टर ,बाळात व्यंग आलं तर??""डॉक्टर,हे इंजेक्शन नको घ्यायला",डॉक्टर,ह्या गोळ्या नको घ्यायला किंवा ह्या गोळ्या गरोदरपणात चालतील का??".
 डॉक्टर ,गरोदरपणात गोळ्या ज्या देतात ते कशासाठी देतात हे कधी विचारलय का??याचे उत्तर म्हणजे नाहीच येईल...याचे उत्तर पाहूयात. सरकारी दवाखान्यातील व खाजगी दवाखान्यातील उपचार पद्धती ही सारखीच आहेत.

 रक्तातील हिमोग्लोबीन वाढीस मदत होईल म्हणून रक्त वाढीच्या गोळ्या FSFA व B विटामिन च्या देतात. गरोदर मातेला कॅल्शियम च्या गोळ्या ही देतात कारण बाळाला व गरोदर मातेला कॅल्शियम गरजेचे असते. आत्ताच नवीन अभ्यासातून असे स्पष्ट झाले आहे की कॅल्शियम च्या गोळ्या मातेने खाल्याने रक्तदाबाचा त्रास होत नाही.  अणि आवश्यक असल्यास मातेच्या दुसर्‍या  आजारा प्रमाणे देतात.गरोदर पण हा काही आजार नाही आहे.गरोदर पण ही अनूभवायची गोष्ट आहे.त्यासाठी खरे पाहता गरोदर ताई ला कोणत्याच गोळ्यांची आवश्यकता नसते??हो नक्कीच नसते.कारण का तर गरोदरपणात गर्भाशयातील बाळ त्याला जे पोषक पदार्थ हवे ते त्याच्या आईकडून घेत राहते.पण जर आई त्या बाळाची जेवणच करत नसेल पोषक तत्व व आवश्यक अशी कॅलरी आहारात घेत नसेल तर बाळाची वाढ कमी होऊ शकते म्हणुन पोषक तत्व व आहार दैनंदिन गरोदर पणात कधी कधी घेण्यात येतच नसतो जो गरोदरपणात आवश्यक असतो. म्हणुनच डॉक्टर मंडळी गरोदर बाई ला ह्या गोळ्या देत असतात त्यामुळे त्या घेणे आवश्यक असते उगीच ते देत नाहीत. 

 गरोदरपणात  दिलेल्या गोळ्या मुळे नव्हे तर बाळात व्यंग जनूकीय बदलांमुळे येत असते.काही गरोदर स्त्री या डॉक्टर ला न विचारतातच गोळ्या घेत राहतात उदा.पाळी येण्या साठी च्या गोळ्या गरोदर असल्याचे माहीत नसताना, तोंडावर आलेल्या pimples करिता (isotretinoin),झटके (epilepsy) च्या गोळ्यांबद्दल न सांगता घेत राहील्यास, इत्यादीं अशा विविध कारणाने व्यंग येऊ शकेल ;डॉक्टर ने दिलेल्या गोळ्यां मूळे नव्हे.
 
2)डॉक्टर,हे इंजेक्शन नको घ्यायला??injection ने बाळात व्यंग आलं तर?
डॉक्टर बाळात व्यंग आलं तर म्हणजे कशानेही व्यंग येत असेल किंवा त्या injection चा जास्त advers effects असेल तर डॉक्टर मंडळी का बरं ते injection देतील मुद्दामून. गरोदर पणात इंजेक्शन कोणते व कशासाठी देतात हे समजणे महत्वाचे.इंजेक्शन धनुर्वात हे घेणे गरजेचेच आहे नाही घेतल्‍यास मातेला धनुर्वात होऊ शकतो.


Anti D हे injection ज्या गरोदर माता चे रक्त गट negative आहे त्यांना  delivery च्या अगोदर द्यावेच लागते. 
 या व्यतिरिक्त ज्यांना गर्भ राहण्या करीता उपचार घेतला आहे त्याना progesterone support करिता progesterone injection दिले जाते. जर एखाद्या patient ला BP वाढल्याने झटका आला तर magso4 व Labetalol हे injection द्यावेच लागते.पेशंट चा जीव धोक्यात असेल तर emergency करिता कोणतीही injection देणे चालेल का नाही?याचे उत्तर हे चालेल चालेल हेच आहे. जर एखादे मातेचे रक्त मधील Hb 7 पेक्षा कमी असेल तर त्या मातेला रक्तवाढी करीता iron sucrose हे injection द्यावेच लागते. 
या मुळे थोडीच काही बाळा मध्ये व्यंग येणार आहे व येतं ही नाही. 
डॉक्टर कधीच असे करत नसतात. जे गरजे च आहे ते दिलच पाहिजे. 
हो हे मात्र खरं आहे की काही injection मुळे बाळा मध्ये व्यंग येतात पण ते आधी माहिती पाहिजे व कधीही कोणालाही डॉक्टर लोक देत नसतात injections . काही antibiotics  उदाहरणार्थ जेन्टामायसीन ,streptomycin,Fluoroquinolones इत्यादी देता येत नाहीत ..anticancer injections ही देता येत नाही कारण यामुळे व्यंग निर्माण होऊ शकते.
3) डॉक्टर ,सोनोग्राफी केल्याने बाळात व्यंग आलं तर??"
आपल्या डॉक्टर लोकांना कधी कधी खूप त्रास होतो असल्या प्रश्न मुळे पण हे विचारात घेतले पाहिजे की आपण डाॅक्टर लोक खूप मोठ्या प्रगत देशात practice करत नव्होत.हे अगोदर नेहमीकरीता लक्षात ठेवले पाहीजे. गरोदर ताई चे व सोबत असलेल्या नातेवाईक यांचे शंकानिरसन केले पाहिजे. SONOGRAPHY मुळे व्यंग येत नाही कारण सोनार चा वापर केला जातो. MRI मुळे ही येत नाही. त्यासाठी गरोदरपणात या तपासणी चा उपयोग केला जातो  नाहीतर या तपासण्या उपयोगात आणल्या नसत्या. 
CT scan ,X ray, radiotherapy,Mammography हे करू नये यामुळे व्यंग निर्माण होऊ शकते.हेही बरोबर आहे. 

सरकारी दवाखान्यातील व खाजगी दवाखान्यातील उपचार पद्धती ही सारखीच आहेत .फरक फक्त पैशाचा व महागडी औषध  चा.सरकारी औषध मूळे बाळ भविष्यात "ढ" होत व खाजगीत ल्या औषध मूळे हुषार होत असे काही नाही.तो उपचार कोठे घ्यावा हा भाग वेगळाच. सगळीकडेच म्हणजे कोणत्याही देशात एकच उपचार पद्धती.एकच मूळ औषधी. गरोदरपणात काय चालत काय चालत नाही याकरीताच हा लेख लिहला ...
@crazycervix 
DRNILESHB 

No comments:

Post a Comment