All Information Related to Women Health And Their Issues like Obstetrics,Pregnancy,Superstitions Mahila Arogya

Monday, September 28, 2020

रजोनिवृत्ती (मेनापॉज) म्हणजे नेमके काय ?

रजोनिवृत्ती (मेनापॉज) म्हणजे नेमके काय ? 

पाळी यायची बंद होणे असा याचा शब्दशा अर्थ आहे . वैद्यकीय परिभाषेत चाळीशीनंतर वर्षभर पाळी आली नाही .
महिन्यातून एक वेळा पाळी येणे ही स्री शरीरची प्रकृती आहे .

एस्ट्रोजन कमी होणे, प्रौढात्वाकडे जाणे आणि तणाव निर्माण होणे ही लक्षणे संप्रेरकाच्या बदलामुळे स्त्रियाच्या वयाच्या ४५ व ५५ व्या वर्षी दिसून येतात. यानंतर स्त्रिची मासिक पाळी पूर्णपणे थांबते. पुररूत्पादनाची क्रिया संपल्याचे हे लक्षण असते.
काही स्त्रिया मध्ये लवकर तर कोणात उशिरा होऊ शकते. 

त्याशिवाय पाळीचे चक्र अव्याहत सुरु राहते १०-१३  वर्षापासून ते ४४ – ५५ वर्षापर्यंत . 
रजोनिवृत्ती (मेनापॉज) होतांना कुठलाही शरीर मानस त्रास होत नसेल तर ती शरीराची प्राकृत स्वाभाविक अवस्था आहे .   उत्पत्ती स्थिती लय हा सृष्टीत जन्माला येणाऱ्या प्रत्येक भावपदार्थाचा निसर्गक्रम आहे .
 आपल्या शरीराचेही आणि शरीरातील स्रोतासंचेही तसेच आहे शरीर बाल, तरुण, वृध्द या तीन अवस्थेतून विकसित होते. ज्याप्रमाणे प्रवासात एखादा चढ आल्यानंतर उतारही येतोच तसेच रजोनिवृत्ती म्हणजे आयुष्याच्या प्रवासातील उताराचा  - लयाचा  टप्पा आहे .  रजोनिवृत्तीनंतर आयुष्यभर अव्याहत चालणारी गर्भारक्षम  रजोप्रवृत्तीची प्रक्रिया थांबते , परिणामी  रजोनिवृत्तीनंतर नैसर्गिक गर्भधारणेची क्षमता देखील  थांबते .   

रजोनिवृत्ती काळात नेमके काय घडते ? 

शरीरात पाळी येण्यासाठी काही अंतस्राव कार्यरत असतात . पाळी जातांना त्यांचे शारीरिक प्रमाण कमी होते , त्यामुळे काही शारीर मानस तक्रारी उद्भवतात . आयुर्वेदीय दृष्टीकोनातून रजोनिवृत्तीमुळे  शरीरात वात दोष वाढून धातूंची झीज होते . रजोनिवृत्ती हे वार्धक्याचे एक लक्षण आहे . 
रजोनिवृत्तीचे प्रकार :  मुख्यता रजोनिवृत्तीचे दोन  प्रकार आहेत . 
1)नैसर्गिक – शरीर क्रियात्मक . यात चाळीशीनंतर अंतस्रावांचे प्रमाण कमी होऊन बिजग्रंथींची कार्यक्षमता कमी होऊन पाळी थांबते . 
2)शस्रक्रियात्मक , उपचारात्मक  – मात्र या  दुसऱ्या प्रकारात बिजग्रंथी अथवा गर्भाशय , कॅन्सर , गाठ ई कारणांमुळे शस्रक्रियेमुळे काढले जातात  व त्यामुळे  रजोनिवृत्ती होते . यातही रजोनिवृत्तीची लक्षणे दिसतात.45 वर्षांत च्या आतच अशी अवस्था अनैसर्गिक असल्याने यातील लक्षणे अधिक त्रासाची असून  इतर अन्य आजारांनाही निर्माण करतात उदा. स्तनग्रंथींची वाढ . काही उपचारांमुळेही अकाली  रजोनिवृत्ती होते उदा. केमोथेरपी , रेडीओथेरपी .   

 रजोनिवृत्ती काळातील लक्षणे :
 स्थानिक तक्रारीत पाळीची अनियमितता , अधिक अंगावरचे जाणे अथवा ना जाणे , श्वेतस्राव  व – अंगावर पांढरे जाणे ,कोरडेपणा , दाह ,शैथिल्य,खाज , सूज , त्वचा जाड होते. 
राग येणे.
सारखी मन:स्थिती बदलणे,एकाग्रता कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे ,तणाव, अस्वस्थता, खिन्नता वाढणे,निद्रानाश ,
रजोनिवृत्तीशी संबंधित शारीरिक बदल/लक्षणे
कमरेतून किंवा छातीतून गरम वाफा सुरू होतात त्या मान आणि चेहर्‍यापर्यंत जातात आणि काही वेळा संपूर्ण शरीरात पसरतात. याबरोबर काही वेळा हृदयाचे ठोके जलद पडतात. अनियमित मासिक पाळी, यात पुढील गोष्टींचा समावेश होतो:

मासिक पाळी काही महिने थांबते आणि पुन्हा सुरू होते, जी जास्त दिवस चालते. काही वेळा खूप रक्तस्त्राव आणि/किंवा रक्ताच्या गुठळ्या पडतात (यामुळे रक्त कमी होऊन अशक्तपणा येतो).



डोकेदुखी, चक्कर येणे,चेहर्‍यावरील केसांची वाढ होते,स्तन संवेदनशील होणे,स्नायूंची स्थितीस्थापकत्व आणि शक्ती कमी होणे,पोटाच्या वरच्या भागात सूज येणे,हाडे ठिसूळ होतात, त्यामुळे हाड मोडण्याची शक्यता वाढून त्याच्या टोकाशी कडक पदार्थ तयार होण्याचा संभव असतो.

No comments:

Post a Comment