All Information Related to Women Health And Their Issues like Obstetrics,Pregnancy,Superstitions Mahila Arogya

Friday, September 18, 2020

एक अविस्मरणीय प्रसंग : वैद्यकीय अधिकारी

बाळाची वाट पाहणा-या मातेला आणि इतर नातेवाइकांना आणखी एक चिंता सतावत असते, नॉर्मल की सीझर? प्रसूती नॉर्मल व्हावी असा घरातील जुन्या जाणत्यांचा आग्रह, तर तब्येतीबद्दल रिस्क नको म्हणून सीझरही चालेल, असे म्हणण्याकडेही आजकालच्या अनेक जोडप्यांचा कल. प्रसूतीविषयीच्या काही समज- गैरसमजांचा आढावा माझ्या एका अनुभवावरुण व प्रसंगावरून घेऊया आजच्या ब्लॉग मध्ये.


दिवसभराच्या Corona च्या कामाने थकून रात्री DMO duty room मध्ये झोप लागल्यासारखे झाले असता , मध्यरात्री दोनच्या सुमारास हॉस्पिटलमधल्या staff चा mobile वर फोन आला, डॉक्टर लवकर या, एक ANC आली आहे व तिचे डोके दुखत आहे.मी स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याने मी गरोदर माता म्हणले की प्राथमिकता गरोदर स्त्री साठी येणारं साहजिकच. असो.
गरोदर पनाचे दिवस भरले होते त्या गरोदर ताईचे .एवढेच नव्हे तर तिच्याकडे एकही सोनोग्राफी व रिपोर्ट सोबत न आणलेली ,सर्व ANC फाईल घरी खेड्यात गडबडीत विसरून राहिलेली सार्वजनिक आरोग्य विभागात काम करत असताना हा अनुभव तसा नेहमीचाच परंतु ही ताई शिकलेली व दुसर्‍यांदा 1 varshatach गरोदर असूनही अडाणी व पहिल्यांदाच गरोदर बाई सारखे अवस्था झालेली तिची... असो. मी त्या गरोदर ताई ची व्यवस्थित तपासणी केली असता तिच्या बाळाचे हृदयाचे ठोके खूपच जलद होते आणि रक्तदाब जास्त होता. प्रसूति ची जागा छोटी असल्याने बाळाचे डोके खूप वर होते.गर्भ पिशवीचे तोंड उघडले नव्हते. पण बाळा भोवतीचे पाणी म्हणजे Amniotic Fluid सर्व कमी झाले hote कारण Amniotic membranes ruptured होते व विशेष बाब म्हणजे तिचे पहिले सिझेरियन झालेले अशा परिस्थितीत स्त्रीरोगतज्ज्ञ या नात्याने आपण काय करू शकतो हे लक्षात असताना ही
बाळ बाहेर येत नाही म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रात पेशंट ला न घेऊन जाता घरीच काही ‘उपाय’ केलेले होते कारण तिच्या माहेरच्या लोकांना तिची नॉर्मल च प्रसूति करायची होती.प्रसूति बाबत त्या ताईच्या नवर्‍याने काहीतरी सांगितले व ते थेट रुग्णालयात दाखल झाले.

पेशंट ला डोके दुखी, चक्कर, उलटी ,मळमळ असे यापैकी एक होत असेल व पेशंट चा BP वाढलेला असेल तर आम्ही लगेच protocol नुसार impending eclampsia (झटका यायच्या अगोदरच) मॅग्नेशियम Sulphate हे injection देऊन व Anti HTN Labetalol देऊन पेशंट डाव्या कुशीवर झोपवून लगेच Higher केंद्र Tertiary Care centre Medical college la लगेच आम्ही सन्दर्भित करतो.त्याप्रमाणे यही patient la पुढे पाठवण्याची तयारी सुरू केली.आधीच या पेशंट ने घरी खूप वेळ घालवलेला.
खरे पाहता ,पहीले caesarean section असता कोणी लगेच नॉर्मल delivery चा विचार करत नसतो. अशा patients ची elective lscs पूर्ण महीने संपण्याची वाट न बघता doctor लोक आमच्यासारखे तरी करतात. पण काही अपवाद वगळता किंवा अपवादात्मक परिस्थितीत normal delivery पण करता येते. रात्रीच्या वेळी सर्व तयारी करून तिच्यावर शस्त्रक्रिया करणेही अत्यंत जोखमीचे काम होते.कारण तिच्याकडे कसलीच रिपोर्ट व USG नव्हते खर तर मुद्दाम हून तिने घरी ठेवलेली.तिला व्यवस्थित विचारपूस व अगोदर च्या गरोदरपणा तील
इतिहास विचारले असता जे माहीत नव्हते ते
समजलेच.तिला Eclampsia,placenta Previa व CPD म्हणुन LSCS केलेले असे तिला सांगितलेले डॉक्टरांनी. खेड्यांतील किंवा काही शहरातील ही या मानसिकतेत असतात की डॉक्टर लोक उगीचच काहीतरी कारण सांगून lscs करतात म्हणुन काही तरी जीवघेणे उद्योग वेळ घालवून घरी करत बसतात तेंव्हा डॉक्टर काहीच करू शकत नाहीत असे होते. यासारखे प्रसंग प्रत्येक प्रसूतीतज्ज्ञाच्या आयुष्यात येतातच. विशेषत: छोट्या शहरांमध्ये ज्यांचा व्यवसाय आहे अशा डॉक्टरांना, तसेच शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना हे नवीन नाही. सिझेरियनच्या भीतीमुळे व नैसर्गिक प्रसूतीच्या अट्टहासामुळे हे घडते. ब-याच जणी कळा सुरू झाल्यावर खूपच उशिरा दवाखान्यात येतात. लवकर गेलो तर ऑपरेशन करतील, असे त्यांना वाटत असते. अर्थात आपल्या देशात गावांमधील अपु-या सुविधा व अज्ञानही याला कारणीभूत आहेच.
याउलट ही दुसरी केस- शहरातील श्रीमंत वस्तीतील एका डॉक्टरचे क्लिनिक. सुशिक्षित, स्वत:चा व्यवसाय असलेली एक स्त्री आपल्या जोडीदाराबरोबर डॉक्टरांना विनंती करते - ‘डॉक्टर, आम्हाला फक्त एकच मूल हवे आहे. मुलगा/मुलगी काहीही चालेल; पण अट एकच-मला किंवा माझ्या बाळाला कोणताही धोका झाला तर ते मला अजिबात मान्य नाही. नैसर्गिक प्रसूतीमध्ये येऊ शकणा-या अडथळ्यांची शक्यता मला नको. सर्व काही नीटच होईल, याची १०० टक्के खात्री मला तुमच्याकडून हवी आहे. शिवाय नैसर्गिक प्रसूतीमध्ये सोसाव्या लागणा-या कळा व होणारे शारीरिक कष्ट मी अजिबात सहन करू शकणार नाही. आम्ही इंटरनेटवरून व वेगवेगळ्या पुस्तकांतून सर्व माहिती मिळवली आहे आणि तुम्ही माझ्यावर मी सांगेन त्या वेळी (मुहूर्त बघून) सिझेरियन करा.’ तिची व बाळाची प्रकृती लक्षात घेता तिची नैसर्गिक प्रसूती होण्याची शक्यता खूपच जास्त होती. तरीही तिचा सिझेरियनचाच हट्ट सर्व समजावल्यावरही कायम होता असेही काही लोक आहेत.जगभरातील अनेक देशांत घडणारा हा प्रसंग सध्या आपल्या देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये घडतो.सिझेरियनच्या शस्त्रक्रियेबाबत असलेले हे दोन दृष्टिकोन.सिझेरियन बाबत आणखी पुढे एक ब्लॉग लिहिणार..असो .तर एवढे सर्व complications गुंतागुंत प्रसूति असताना तेही रात्री च्या वेळी भूल तज्ञ नसताना,High risk प्रसूति असताना, एकही patient ने रिपोर्ट घेऊन न आल्यावर काय वाटते ते मलाच व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर ला माहीत व असा अनुभव येऊ पण नये.


स्वतः प्रसूति तज्ज्ञ असताना देखील आपण नुसते विचार सिझेरियन बदल करू शकतो व अशा अवस्थेत काहीच करू शकत नसल्याने अडाणी माणसा सारखे वाटू लागते दूसरे काही नाही.काखेत कळसा गावाला वळसा असे वाटू लागले. पण या case मध्ये Patient ला पुढे higher center ला सिझेरियन व सोनोग्राफी करीता पुढे पाठवीन्या याशिवाय दुसरा मार्ग काहीही नसतो.असे अनुभव स्त्री रोग विशेषज्ञ नसलेल्या
वैद्यकीय अधिकारी यांना सार्वजनिक आरोग्य विभागात काम करत असताना PHC la तर नेहमीच येतात पण ग्रामीण रुग्णालय किंवा Subdistrict Hospital मध्ये कधी तरीच येतात. डॉक्टर असूनही नसल्यासारखे भास येऊन जातोच हे नक्की. English मध्ये हा ब्लॉग वाचायचा असल्यास येथे click करा

@crazycervix 

2 comments: